ओ.बी.सी जातिनिहाय जनगणना जनजागृती मोहीम.

वणी – विजयादशमीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून अत्यंत उत्साहामध्ये जनगणना रॅली काढण्यात आली. यावेळी “ओबीसींची जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे”
“जय ओबीसी,जय संविधान” या घोषणांनी वातावरणात उत्साह संचारला होता. यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित लोकांना जनगणनेची माहिती देणारी पत्रके वाटण्यात आली. त्याचबरोबर जातिनिहाय जनगणना महत्त्व आणि गरज याविषयी थोडक्यात माहिती देण्यात आली
तसेच, विविध पक्ष, विचारधारा,संघटनामध्ये विभागलेल्या ओबीसी जातीबांधवांना या मोहिमेत सहभागी होण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले.दिनांक 26 ऑक्टोबर 2020 ते 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत सलग 18 दिवस ही मोहीम राबविण्यात येणार आहे. वणी व मारेगाव तालुक्यातील ग्रामीण भागात दौरे काढून ओबीसींच्या जातनिहाय जनगणनाविषयी लोकांचे प्रबोधन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी अंबादास वागदरकर, भाऊसाहेब आसुटकर,ऋषीकांत पेचे,संजय चिंचोलकर,राजू तुरानकर,प्रविण खानझोडे,प्रदीप बोरकुटे, अजय धोबे,संजय पेचे मारोती जिवतोडे, मारोती मोडक, मंगेश खामनकर,अमोल टोंगे, दत्ता डोहे,नितीन मोवाडे, नरेंद्र गायकवाड विकेश पानघाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.