SC आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी औरंगाबाद मध्ये राज्यस्तरीय बैठक संपन्न
SC आरक्षण वर्गीकरण करण्यासाठी औरंगाबाद मध्ये राज्यस्तरीय बैठक संपन्न
10 लाख स्वाक्षरी मोहिमेला शुभारंभ
औरंगाबाद: अनुसूचित जाती आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात यावे यासाठी SC आरक्षण वर्गीकरण कृती समिती, महाराष्ट्रद्वारे 10 लाख स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम 14 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. त्यानिमित्त औरंगाबाद येथे दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी दु.12:00 वाजता राज्यस्तरीय बैठक सुभेदारी विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आलेली होती. सदर बैठकीत लोकस्वराज आंदोलन, महाराष्ट्र राज्य मादगी समाज संघटना , विदर्भ लहुजी सेना, जनता क्रांती दल, बहुजन न्याय आंदोलन, फकीरा पॅंथर, मजूर संग्राम, जनहित लोकशाही पक्ष, क्रांतिगुरू सोशल फाउंडेशन, आरक्षण परिषद, लहू सेना, लहुजी संघर्ष सेना, लाल पॅंथर, न्यू टायगर सेना, जनहित युवा मोर्चा, मातंग पॅंथर, रिपब्लिकन क्रांती सेना, लहुजी सेना, मातंग पंचायत, महाराष्ट्र लहुजी सेना,अंबुज पार्टी आॅफ इंडिया, लाल सेना, दलित युवक आंदोलन, फकीरा दल, महाराष्ट्र लहुजी सेना,डी पी आय, लहुजी साळवे विकास परिषद,मातंग प्रबोधन,, समसत मादिगा समाज, परिषद, भारतीय दलित संसद* आदी संघटना मोठ्या संखेने सहभागी होत्या. लोकस्वराज्य आंदोलनाचे संघटक प्रा. रामचंद्र भरंडे यांनी मार्गदर्शन केले. त्याचबरोबर 10 लाख स्वाक्षरी मोहिमेला शुभारंभ करण्यात आला.




