पोंभुर्णा भाजपा महिला मोर्चा, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतिने धरणे आंदोलन.
महाराष्ट्रातील महाविकास आघाड़ी सरकारचा जाहीर निषेध
भारतीय जनता पार्टी,पोंभुर्णा तालुक्याच्या वतीने महाराष्ट्रात महिलांवरील दिवसेंदिवस वाढते अत्याचार लक्ष्यात घेता, अजूनही सरकार महिला अत्याचाराविषयी गंभीर नाही या झोपलेल्या महाविकास आघाडी सरकारला जाग आणण्यासाठी व सोबतच विविध मागण्यासाठी पोंभुर्णा भाजपा महिला मोर्चा,भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने माजी.मंत्री.मा.आमदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार,मा.श्री. हंसराज भैया अहीर माजी केंद्रीय गृह राज्य मंत्री, मा.श्री.देवरावभाऊ भोगळे भाजपा जिल्हा अध्यक्ष चंद्रपुर, यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील आघाड़ी सरकारला धडा शिकवण्यासाठी मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले.
भाजपा पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात भव्य रॅली काढून पोंभुर्णा तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनाला भाजपा पदाधिकारी, महिला आघाड़ी, युवा मोर्चा आघाड़ी,शाखा पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित होते.



