Vidarbh24News

Latest Online Breaking News

शेतकरी संघटनेची वनमंत्र्याकडे मागणी वाघाला जेरबंद शक्य नसल्यास ठार करा

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा शहर/ तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१.

शेतकरी संघटनेची वनमंत्र्याकडे मागणी वाघाला जेरबंद शक्य नसल्यास ठार करा

राजुरा.७ ऑक्टोबर –
मध्य चांदा वनविभागात राजुरा, विरुर स्टेशन वनपरिक्षेत्रात आरटी २ या वाघाने घुमाकुळ घातला असून या वाघाला पकडण्यात वनविभागाला अपयश आल्याने नागरिकांचे व त्यांच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी आता या नरभक्षी वाघाला मारून टाकण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री ना. संजय राठोड यांचे कडे ई-मेल पाठवून केली आहे.
राजुरा, विरुर तसेच लगतच्या लाठी भागात वाघाच्या हल्ल्यात आतापर्यंत दहा शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले आहे. या वाघाला पकडण्यात वन विभागाला अपयश आल्याने आता नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी तसेच त्यांना जीविताची हमी देण्यासाठी या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करणे अती आवश्यक आहे. शेती हा व्यवसाय व त्यावर उपजीविका असणारे शेतकरी,,शेतमजूर यांनी सुरळीत शेती व्यवसाय करून पुरेसे उत्पन्न काढावे, या सर्व बाबी विचारात घेता नरभक्षी भागाला तात्काळ मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी संघटनेने राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना ई-मेल द्वारे केली आहे.. राळेगाव – पांढरकवडा आणि ब्रह्मपुरी या भागात यापूर्वी परवानगी देऊन वाघाला ठार मारण्यात आले होते. वाघाच्या हल्ल्यात मृत खांबाडा येथील मारोती पेंदोर याचे मुलाला वनविभागात नोकरीत सामावून घ्यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
लोकशाहीत नागरिक हाच राष्ट्राचा व देशाच्या लोकशाहीचा कणा असून त्याचे जीविताचे व पशुधनाचे संरक्षण करणे, ही राज्य व केंद्र सरकारची घटनात्मक आणि प्रथम जबाबदारी आहे. त्यादृष्टीने या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते,, माजी आमदार ऍड. वामनराव चटप, प्रभाकर ढवस, आबाजी ढवस, भास्कर शिडाम,डॉ. गंगाधर बोढे,विठ्ठल किन्नाके,पुरुषोत्तम अंगलवार, श्रीहरी डाखरे, आनंद चहारे, महादेव धोटे, भाऊराव वांढरे, सत्यपाल तोडासे,प्रभाकर लोहे, जीवन आमने, चरणदास बोटरे, पांडुरंग चंंदे,रामदास नक्कलवार,गुलाब ताकसांडे,श्रीनिवास इंदूलूला, विलास हजारे, विठोबा लोणारे,वामन मडावी, विठ्ठल खेकारे, बाळकृष्ण लडके,महेश तनिरवार,केशव कुळसंगे ,सुधाकर अमृतकर, ऊद्धव कुळसंगे, विलास बोबडे, सेकंड देरकरया शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह विनोद लखमापूरे, प्रकाश रोहणे, भाऊजी पेंदोर, साईनाथ झुरमुरे, किसन पुसाम, प्रभाकर धानोरकर, सुरेश आस्वले, जगदीश बोभाटे,पांडुरंग साळवे, संतोष मुडपेवार,मारुती सोयाम, नरेश गुरनुले, विष्णू राठोड,संजय सबावत, मधुकर उरकुडेहिरामण अजमेरा यांचेसह विरुर, विहिरगाव, खांबाडा, मूर्ती, नलफडी,सिंधी, धानोरा, कवीटपेठ,बंजारागुडा,चिंचोली बु.,अंतरगाव,अनुर,अमृतगुडा, सुबई,थोमापुर,पिंपळगाव, नवेगाव,नवी बेरडी,चिचबोडी, सोनुर्ली, सिर्सी, टेम्बुरवाही, चूनाळा, मुंडीगेट,डोंगरगाव या गावातील वाघाच्या दहशतीत असलेल्या व शेती करण्यास असह्य झालेल्या नागरिकांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!