कायर येथील ग्रामपंचायतने नवीन दारुच्या दुकानाला दिलेले N.O.C रद्द करा – गावकरी यांचे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात निवेदन
कायर येथील ग्रामपंचायतने नवीन दारुच्या दुकानाला दिलेले N.O.C रद्द करा – गावकरी यांचे राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात निवेदन
वणी- तालुक्यातील कायर येथील दारुच्या दुकानाला दिलेला N O C रद्द करा हि मागणी गावकरी यांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात निवेदनातून केली आहे.कायर येथील बाबापुर पिंपरी हा रस्ता रहदारीचा असून रेल्वे बायपास हा मुख्य रस्ता आहे .बाबापुर पिंपरी येथील शालेय विद्यार्थी ,महिला येथील शेतकऱ्यांसाठी हा प्रमुख मार्ग आहे. या दुकानामुळे दारुड्या लोकांपासून संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहेत .याच मार्गावर देवीचे मंदीर सुद्धा आहे. अवघ्या शंभर मीटरच्या अंतरावर असून भाविकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो .यासाठी गावातील लोकांनी एकत्र येऊन या दारूच्या दुकानाचे जे ग्रामपंचायतेने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावे ही मागणी बाबापुर व कायर येथील गावकरी यांनी केलेली आहे
v.
सरकारी आदेशानुसार जा गावाची लोकसंख्या तीन हजार आहे त्या गावात देशी दारूचे दुकान बंद करण्यात आले होते.म्हणून कायर गावातील दोन सरकारी देशी दारुचे व दोन बियर बार बन्द करण्यात आले होते.आजच्या परिस्थितीत ते चारही दुकाने बन्द आहे.अशी बाब असताना देखील बाबापुर पिम्परी रोडला लागुन नवीन देशी दारु व बियर बारचे दुकान स्थलांतर करण्याकरिता ग्रामपंचायतने NO C दिला असा आरोप निवेदनातून गावातील नागरिकांनी केला आहे.गावातील लोकसंख्या लक्षात घेतले असता हा N O C कसा क़ाय देऊ शकता ?असा प्रश्न गावकरी करत आहे. व ग्रामपंचायतेची सर्व कागदपत्राची सखोल चौकशी करावी व नवीन दारुच्या दुकानाला दिलेला ना-हरक़त प्रमाणपत्र रद्द करावी ,हि मागणी गावातील जनता करत आहे.



