Vidarbh24News

Latest Online Breaking News

कांदा निर्यात बंदी तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्या :बेबीताई उईकेची, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यांची मागणी

आशिष यमनुरवार विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१

कांदा निर्यात बंदी तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांना न्याय द्या सौ. बेबीताई उईकेची, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यांची मागणी

दिनांक १८ सप्टेंबर २०२० ला चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन.

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या नेतृत्वात कांद्यावरील निर्यात बंदी केल्याने केंद्र सरकारच्या निषेधार्थ शेतकऱ्यांची लूट हे मोदी सरकारची भूक ,कांद्यावरील निर्यात बंदी तात्काळ हटवा, शेतकरी टिकेल तर शेती पिकेल,अश्या घोषणाबाजी करत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने साहेब यांना सव्वा किलो कांदा भेट देऊन त्यांच्या मार्फत पंतप्रधान मा .नरेंद्रजी मोदी यांना निवेदन पाठविण्यात आले.

जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हणाल्या सध्या मोठया प्रमाणात कांदा महाराष्ट्रlतील शेतकऱ्यांनी लावलेला आहे.. कांद्याला चांगला भाव मिळायला लागला होता. की लगेच भाजप सरकारने निर्यात बंदी घातली ही निर्णयात बंदी बिहार मधील निवळणूका डोळ्यासमोर ठेऊन घातली आहे हे अवघ्या देशाला माहीत आहे हे सर्व सामन्याचे सरकार नाही हे यातून स्पष्ट होते या एका निर्णयामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी केंद्रातील मोदी सरकार देशोधडीला लावला .दुष्काळ गारपीट, टंचाई, रोगराई अश्या कित्येक नैसर्गिक सामना करत असतांना शेतकऱ्याने पोटाच्या मुलाप्रमाणे सांभाळलेला पीक शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागणार आहेत. महाराष्ट्रl तील शेतकरी टिकला तर शेती पिकेल कोरोनाच्या या संकटतकाळात डॉक्टर, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, मोठ्या समवेत राबतांना दिसला तो बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी या सर्व गोष्टींचा विचार करून केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी रद्द करावी व शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली यावेळी याआंदोलनात उपस्थित महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके जिल्हासचिव शोभा घरडे राणी रॉय रंजना नागतोडे नीलिमा नरवडे माधुरी पांडे सुमित्रा वैद्य नंदा सोनूले स्वेता रामटेके प्रतीक्षा अलोने व अन्य महिला उपस्थित होत्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!