विज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
विज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू
जेप्रा/ गडचिरोली
बरेच दिवसानंतर दडी मारलेल्या पावसाने आज सकाळपासूनच गर्जना सहित पाऊस पडला. नेहमीप्रमाणे यादव विठ्ठल गावतुरे वय 58 वर्षे हेआपल्या शेतावर काम करण्यासाठी गेले होते पण त्यांच्यावर निसर्गाचा कोप झाला त्यामुळे विज कोसळून यादव विठ्ठल गावतुरे ११ वाजता सुमारास जागीच मरण पावले. 2 वाजून गेले तरी घरी परत न आल्यामुळे घरच्यांना चिंता वाटू लागली त्यामुळे ते लगेचच शेतांमध्ये गेले तेंव्हा त्यांना प्रेत आढळून आले. त्यांच्या पाश्च्यात पत्नी तीन मुले व सून व नात असा आप्त परिवार आहे.



