——————————- ⛔ *तेलीमेंन्ढा येथील स्थानिक नागरिकांची तक्रार ; अपूर्ण नाली सिमेंट रोड बांधकामामुळे अपघात होण्याची शक्यता* ⛔
——————————————————
⛔ *तेलीमेंन्ढा येथील स्थानिक नागरिकांची तक्रार ; अपूर्ण नाली सिमेंट रोड बांधकामामुळे अपघात होण्याची शक्यता* ⛔
——————————————————
👉 *भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा याचीं तेंली मेंढा येथे भेट.*
नागभीड : तेली मेंन्ढा येथे स्थानिक विकास निधी अंतर्गत काही सिमेंट रोड बांधकाम करण्यात आले माञ अजूनही नालीवरील सिंमेट कलवट पूर्ण केलेले नाही. सार्वजनिक बांधकामाच्या दुर्लक्षामुळे, कञांटदाराच्या अवैध बांधकामामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे स्थानीय नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
याची माहिती तेली मेंढा येथील नागरिकांनी भारतीय क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डार्विन कोब्रा यानां दिली. घटनास्थळी पोहचून उपसरपंच याचेशीं चर्चा केली. उपसरपंच म्हणाले, कंत्राटदार व बांधकाम विभागाना वारंवार तक्रार करूनही दुर्लक्ष करीत आहे.
बांधकाम विभाग व कंत्राटदारांने अपूर्ण काम, नालीवरील सिंमेंट कलवट बांधकाम न केल्यास भारतीय क्रांतिकारी संघटना आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष टेरेन्स कोब्रा यांनी दिला आहे.



