राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यात व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अवैध धंद्यांवर वर आळा घालण्यात यावा अशी मागणी- सूरज अरविंद ठाकरे प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर.
आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज राजुरा शहर तालुका प्रतिनिधी ८८५५९९४००१
राजुरा विधानसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यात व चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यात अवैध धंद्यांवर वर आळा घालण्यात यावा अशी मागणी- सूरज अरविंद ठाकरे प्रहार जनशक्ती पक्ष चंद्रपूर.*
प्रति,
सन्माननीय अनिल देशमुख साहेब
गृहमंत्री महाराष्ट्र राज्य
विषय:-कोरपणा, जिवती, गोंडपिंपरी, राजुरा, या चंद्रपूर जिल्ह्यातील चारही तालुक्यांमध्ये व इतर सर्वच तालुक्यांमध्ये दारू तस्करी व कोळसा तस्करी, सट्टा बाजार हा आपल्या अगदी चरम सीमेवर आहे. यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या सर्व पोलिस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी थेट दारू तस्कर व कोळसा तस्कर तथा इतर अवैध धंदे करणाऱ्यांच्या थेट संपर्कात आहेत व अंदाजन प्रत्येक पोलीस स्टेशनला दहा ते पंधरा लाख रुपये महिना या माध्यमातून ही तस्कर मंडळी देत आहेत या करिता पोलिस निरीक्षक यांचे खाजगी मोबाईल क्रमांक चे कॉल रेकॉर्ड चेक करावे व यांच्यावर चौकशी बसवावी याबाबत विनंती अर्ज.
सन्माननीय महोदय,
वरील विषयास अनुसरून मी आपणास नम्र विनंती करतो की, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असलेली दारूबंदी ही चंद्रपूर जिल्ह्यातील बेरोजगार व सुशिक्षित मुलांना गुन्हेगारीच्या वाटेवर घेऊन जात आहे यात काहीच वाद नाही
परंतु यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा ही सर्वतोपरी दोषी आहे . पोलिसांनी जर ठरवले तर कुणाच्या दारा समोरून एक दगड पण चोरी जाऊ शकत नाही परंतु जिल्ह्यातील जवळपास सर्वच पोलिस स्टेशनचे अधिकारी वर्ग व काही ठराविक कर्मचारी वर्ग हे दारू तस्कर ,कोळसा तस्कर, सट्टा चालवणारे, सुगंधित तंबाखू चा व्यापार करणारे अशा सर्व अवैद्य धंदे करणाऱ्यांपासून आपल्या खासगी मोबाईल नंबर ने थेट संपर्कात आहेत व प्रत्येक पोलीस स्टेशनला अंदाज दहा ते पंधरा लाख रुपये महिना कदाचित यापेक्षा जास्तच ही सर्व अवैध धंदे करणारी मंडळी पोहोचवीत आहेत. हा माझा आरोप आहे . यातील सत्य बाहेर आणायचे असल्यास या पोलीस निरीक्षकांची तथा काही ठराविक कर्मचाऱ्यांची जे पोलिस निरीक्षक यांच्या मर्जीतले आहेत. यांचे खाजगी मोबाईल नंबर् चे कॉल डिटेल काढल्यास सर्व प्रकार उघडकीस येईल व माझी मागणी अशी आहे की, यांचे कॉल डिटेल्स कृपया काढून यांचेवर चौकशी करावी जवळपास सर्वच अवैध धंदे करणाऱ्यांचे नंबर आपल्याला या कॉल डिटेल्स मध्ये आढळून येतील यात काहीच शंका नाही व ही मंडळी आपण पण कारवाई करतो आहे याचे सोंग दाखवून महिन्या किंवा दोन महिन्यातून एक-दोन वेळा स्वतःहूनच दारू विक्रेते ,कोळसा विक्रेते, अवैध धंदे करणाऱ्यांवर धाडी टाकून कारवाईचे सोंग दाखवीत आहेत. रोज लाखो रुपयांची दारू लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू व लाखो रुपयांचा सट्टा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादाने सुरू आहे.
सन्माननीय महोदय भारतीय जनता पक्षाची सत्ता जाऊन काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेना व इतर सहाय्यक पक्षाची सत्ता महाराष्ट्र मध्ये आले व मराठी जनतेला आपले शासन आल्यासारखे वाटत आहे समस्त चंद्रपुरातील जनतेला हे सत्य माहिती आहे. यात काहीच वाद नाही .परंतु पोलिस प्रशासनाच्या अशा वागणुकीमुळे महाराष्ट्र शासनाची व महाराष्ट्र पोलिसांची छबी हे दिवसेंदिवस जनसामान्यांमध्ये खराब होत आहे. आपणापासून चंद्रपुरातील जनतेला व मला आस आहे की, आपण असे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून शांतता सुव्यवस्था राखणे मध्ये व कायद्यावर सामान्य जनतेचा विश्वास ठेवण्यामध्ये महाराष्ट्र शासनाला मदत कराल माननीय महोदय आपल्या पासूनच अपेक्षा आहे व आपण हे सर्व थांबवू शकता व भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करून तुरुंगामध्ये डांबू शकता
वरील विषय हा अत्यंत गंभीर असून याचे गांभीर्य ओळखून कृपया आपण यावर कारवाई करावी ही आपणास कळकळीची समस्त चंद्रपुरातील जनतेकडून नम्र विनंती
आपला नम्र
सूरज अरविंद ठाकरे
प्रहार जनशक्ती पक्ष
चंद्रपुर



