राजुरा येथे आज दुपारी दुचाकी वाहन आणि ट्रोली रिक्षा मध्ये जबरदस्त धडक.
राजुरा येथे आज दुपारी दुचाकी वाहन आणि ट्रोली रिक्षा मध्ये जबरदस्त धडक.
राजुरा शहरातील सर्वात रहदारीचा रस्ता पंचायत समिती ते गडचांदुर व नाका नं.३ ते पंचायत समिती आहे या मार्गावर २४तास मोठ्या लहान वाहनांची रहदारी सुरू असते.
आज दुपारी ३.३०च्या सुमारास वसाके गैरेजचा समोरील चौरस्त्यावर नाका नं.३ कडून येणाऱ्या भरधाव दुचाकी सवार मंगेश बाबुराव ताजणे,वय ३०वर्ष,रा.गोयेगाव बजाज मोटरसायकल MH 34AD 4054 ने विरूद्ध दिशेने येणाऱ्या लतिफ अजीज खान पठाण, वय- ५५वर्ष रा.सोनीयानगर, राजुरा यांच्या ट्राली रिक्षा येऊन जबरदस्त धडक दिली त्यात रिक्षा चालक यांचा पायाला जबरदस्त मार लागला,त्यांना राजुरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले पण त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैधकिय अधिकारिनी त्यानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.. त्यात मंगेश ताजने हा युवक दारूच्या नशेत होता तो देखील रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिवाडर वर जाऊन पडला. त्याला सुध्दा मार लागला. रस्त्यावर लोकांची गर्दी उसळली त्याला राजुरा ग्रामीण रुग्णालय येते नेण्यात आले.

घटना स्थळी राजुरा पोलीस निरीक्षक अधिकारी श्री. सतिष गोडसे, पो. ह. श्री. पांदरे, पि. एन.श्री.भेंडेकर व श्री. कोवले येऊन घटनेचा पंचनामा केला व पुढील तपास सुरू आहे.
याचौरस्त्या वर नेहमीच अपघात होत असतात. रात्रीच्या वेळी या चौरास्त्या वर अंधार असतो इथे स्ट्रेट लाईटची आवशकता आहे पण राजुरा प्रशासन या कडे लक्ष देत नाही. राजुरा शहर प्रशासनाने याकडे लक्ष द्यायला पाहिजे जेणकरून भविष्यात अपघात होणार नाही.
या रास्त्या वर रात्रीच्या वेळी काही तरुण मंडळी रेसिंग सारखे दुचाकी वाहन चालविता या कडे राजुरा पोलीस वाहतून नियंत्रण विभागाने लक्ष द्यायला पाहिजे.




