Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाच्‍या बांधकामसाठी 11 कोटी 42 लक्ष 58 हजार रू. निधी मंजूर*

*पोंभुर्णा तालुक्‍यातील जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाच्‍या बांधकामसाठी 11 कोटी 42 लक्ष 58 हजार रू. निधी मंजूर*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत*

*लवकरच कामाला होणार सुरुवात*

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नक्षलग्रस्‍त भागाच्‍या विकासाकरिता केंद्र शासनाच्‍या आरसीपीएलडब्‍ल्‍युई या योजनेअंतर्गत पोंभुर्णा या नक्षलग्रस्‍त तालुक्‍यातील जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी 11 कोटी 42 लक्ष 58 हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे.
नक्षलग्रस्‍त भागाच्‍या जलद विकासाच्‍या दृष्‍टीने रस्‍ते जोडणी कार्यक्रम केंद्र शासनातर्फे राबविला जातो. या कार्यक्रमांतर्गत जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाचे बांधकाम करावे यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्र शासनाकडे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला आहे. त्‍यांच्‍या या प्रयत्‍नांना यश प्राप्‍त झाले असून जुनगांव ते गंगापूर टोक या रस्‍त्‍यावर मोठया पुलाचे बांधकाम करण्‍यासाठी 11 कोटी 42 लक्ष 58 हजार रू. निधी मंजूर करण्‍यात आला आहे. सदर पुलाच्‍या बांधकामाबाबत या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी होती. आ. मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी ही मागणी आता पूर्णत्‍वास आली आहे. सदर कामाचा कार्यारंभ आदेश निर्गमित करण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे .

सदर मागणी पूर्णत्‍वास आल्‍याबद्दल जिल्‍हा भाजपाचे अध्‍यक्ष देवराव भोंगळे, पोंभुर्णा तालुका भाजपाध्‍यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍य राहूल संतोषवार, पंचायत समितीचे उपसभापती सौ. ज्‍योती बुरांडे, पं.स. सदस्‍य विनोद देशमुख, गंगाधर मडावी आदींनी आ. सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन करत आभार व्‍यक्‍त केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!