शिवणी,कृपाळा, गावात पुराच्या पाण्यानी केला कहर..
२० ते ३० घरे पाण्याखाली,पुराची आली लहर केला कहर
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / शिवणी:- गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे विविध नदयांना पुर आला आहे.या पुराचे पाणी गडचिरोली जिल्ह्यातील शिवणी,कृपाळा,हिरापूर,येवली,रामपुरी, गोविंदपूर येथे शिरल्याने गावातील लोकांचे जनजिवन धोक्यात आले आहे.याबाबत स्थनिक ग्रामपंचायत किंवा शासन कुठलीही दखल घेतली नसून अनेक घरे पाण्याखाली सापडल्याने येथील २० ते ३० कुटुंबांना इतर गावातील लोकांच्या घरात आसरा घेत आहे.बऱ्याच शेतकऱ्यांची धाणारी शेती पुराच्या पाण्याखाली गेल्याने त्यांचे वार्षिक उत्पन्न विस्कळीत आले आहे.

या नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची शासनांनी गावात,शेतात जावून पूरपरिस्थीतीबाबत पाहणी करून नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात व पुरपरिस्थितीमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा सामना करत असलेल्या नागरिकांना प्रशासन आवश्यक ती मदत तात्काळ करण्याची गरज आहे.पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबातील लोकांना व शेतकऱ्यांना प्रशांसण तत्काळ काय मदत करते याचेकडे जनतेचे लक्ष लागले आहे.




