बाम्हणी पुलावर पाणी आल्याने मुल – गोंडपिपरी मार्ग बंद
: गोसेखुर्द धरणातून तब्बल २३ हजार २४१ क्यूमेक्स पाणी सोडण्यात आले आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे गोसेखुर्द धरणाचे २६ दरवाजे साडेतीन मीटरने , तर ७ दरवाजे ४ मीटरने उघडण्यात आले आहे . यामुळे नद्यांना पूर आला असून जिल्ह्यातील काही मार्ग बंद पडले आहेत. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्दच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पाण्याने वेढले आहे. दरम्यान घाटकूळ नदीला पाणी आल्याने शेजारी असलेल्या अंधारी नदीला दाब आला व मुल – गोंडपिपरी मार्गावरील बाम्हणी जवळील पुलावर पाणी आल्याने आज सकाळी 10.00 वा.मार्ग बंद करण्यात आला. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.



