Vidarbh24News

Latest Online Breaking News

भारतीय जनता पार्टी गडचिरोली तालुक्याच्या वतीने विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन

पोर्ला,जेप्रा,मौशिखांब, अमिर्झा येथे भाजपाचे घंटानाद आंदोलन

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/गडचिरोली: २९ ऑगस्ट रोजी विविध ठिकाणी भारतीय जनता पार्टी गडचिरोली तालुक्याच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे खासदार अशोक जी नेते, आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बंद असलेले मंदिरे सुरू करण्यात यावे याकरीता तालुक्यातील पोर्ला, जेप्रा,मौशिखांब, अमिर्झा येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. राज्यातील बंद मंदिरे सुरू करण्यात यावे याकरीता हे आंदोलन असल्याचे तालुका अध्यक्ष रामरतनजी गोहणे व उपसभापती विलासजी दशमुखे यांनी या प्रसंगी म्हटले आहे.केंद्र सरकारने काही नियमांचे पालन करून मंदिरे सुरू करण्यात यावे असे निर्देश दिले असूनही आपले राज्य वगळता संपूर्ण देशात मंदिरे भक्त भाविकांसाठी खुली करण्यात आली.मात्र महाराष्ट्रात अजूनही मंदिरांना टाळे लावून बंदिस्त करून ठेवण्यात आले आहे त्यामुळे हे मंदिर भक्त व भाविकांसाठी तात्काळ खुले करावे याकरिता घंटानाद आंदोलन करण्यात आले.पोर्ला येथे आंदोलनाचे नेतृत्व पंचायत समिती उप सभापती विलासजी दशमुखे, महामंत्री हेमंत पाटील बोरकुटे, लोमेश कोलते राजू खंगार, यांनी तर मौशीचक व अमिर्झा येथे आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष रामरतन गोहने पं.स.शंकरजी नैताम,डॉ प्रमोद धारणे यांनी केले.
तसेच जेप्रा येथे झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ दुर्गाताई काटवे, देवानंद चलाख यांनी केले आंदोलनाच्या वेळी धार्मिक साधू संतासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क साधा-9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!