Vidarbh24News

Latest Online Breaking News

नदीला पूर आल्याने सावली -हरांबा मार्ग बंद

 

नदीला पूर आल्याने सावली -हरांबा मार्ग बंद

गडचिरोली जिल्ह्यातील काही मार्ग बंद

विदर्भ24न्यूज प्रतिनिधी

सावली – गोसेखुर्द धरणातून तब्बल २३ हजार २४१ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. भंडारा व गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे गोसेखुर्द धरणाचे २६ दरवाजे साडेतीन मीटरने , तर ७ दरवाजे ४ मीटरने उघडण्यात आले आहे . यामुळे नद्यांना पूर आला असून जिल्ह्यातील काही मार्ग बंद पडले आहेत. गोसेखुर्दच्या आजपर्यंतच्या इतिहासातील हा सर्वांत मोठा विसर्ग आहे. गोसेखुर्दच्या पाण्यामुळे गाढवी व पाल नदीला पूर आल्याने सावली, हरांबा मार्ग, गडचिरोली – आरमोरी मार्ग , शिवणी नाल्याच्या पुरामुळे गडचिरोली चामोर्शी , गाढवी नदीच्या पुरामुळे आरमोरी – रामाळा , तसेच रस्त्यावर पाणी आल्याने देसाईगंज – लाखांदूर हे मार्ग बंद झाले आहेत. दरम्यान नदीकाठच्या गावांनी सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!