Vidarbh24News

Latest Online Breaking News

वैनगंगा नदीच्या दाबामुळे सावली तालुक्यातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा 

वैनगंगा नदीच्या दाबामुळे सावली तालुक्यातील शेकडो एकर जमीन पाण्याखाली

पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा 

विदर्भ24न्यूज प्रतिनिधी

सावली -गोसेखुर्द प्रकल्पाचे सर्वच दरवाजे उघडल्यामुळे वैनगंगा नदीला पूर आलेला आहे. पाण्यामुळे नदी काठावरील छोटे-मोठे नाले तुडुंब भरलेले असून पाण्याचा वाढत्या दाबामुळे सावली तालुक्यातील शेकडो एकर शेतामध्ये पाणी आल्याने उभ्या डौलदार पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
सावली तालुक्यातील करोली,आकापूर,बोरमाळा, गेवरा,डोंगरगाव,निफंद्रा,विहिरगाव,निमगाव,चीचबोडी,दाबगाव,थेरगाव,व्याहाड,वाघोली, सामदा, सोनापूर,निलसनी पेठगाव,हरंबा,डोनाळा, कढोली,लोंढोली,साखरी,शिर्शी,जीबगाव,उसेगाव, रुद्रापूर,कवठी,पारडी,हरणघाट ही गावे वैनगंगा नदीच्या काठावर आहे.त्याच प्रमाणे मोठ्या प्रमानात शेतजमिनी सुद्धा आहे. आणि त्या जमिनी मध्ये धान, कापूस,सोयाबीन चे उत्पादन घेणे साठी लागवड केली आहे. परंतु गोसे प्रकल्पाच्या पाण्यामुळे नदीला पूर आले आणि नाले भरून आले नाल्या लगत च्या आणि नदी लगतच्या जमिनीमध्ये पुराचे पाणी शिरून धान आणि कापूस,सोयाबीन बुडून गेल्यामुळे धान आणि कापूस,सोयाबिन यांचे पीक पूर्णतः जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
या वाढत्या पाण्यामुळे अनेक जवळील गावात पाणी घुसलेला आहे.तसेच बातमी लिहेपर्यंत निमगाव-अंतरगाव, हरंबा-शिर्शी मार्ग व कवठी-पारडी मार्ग बंद झालेला आहे.तसेच अनेक नाले पूर्णतः भरून जात आहे.अनेक शेतात पाणी हा 4 ते 5 फूट पर्यंत जमा झालेला आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची लाखो ची हानी झालेली असून तहसील प्रशासन व पोलीस प्रशासन याकडे नजर ठेवून आहेत.व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!