Vidarbh24News

Latest Online Breaking News

भंगाराम तळोधी भागातील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर साहेब, यांनी दिलेल्या किटकनाशकाच्या मात्राप्रमाणे पिकांची फवारणी करण्यास शेतकरी बंधूना आव्हान;

भंगाराम तळोधी भागातील शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर साहेब, यांनी दिलेल्या किटकनाशकाच्या मात्राप्रमाणे पिकांची फवारणी करण्यास शेतकरी बंधूना आव्हान;

नितीन रामटेके
गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी
८६९८६४८६३४

गोंडपिपरी: तालुक्यातील भंगाराम तळोधी भागातील शेतकऱ्यांनी शेतीतील पिकांची फवारणी करताना काही काळजी पूर्वक व योग्य त्या औषधांची फवारणी करावी, असे आव्हान गोंडपिपरी तालुक्याचे कृषी सहाय्यक श्री. पी.पी.पेन्दोर साहेब, यांनी केले आहे. किटकनाशकाची फवारणी करताना कपाशीवर कीड/रोग जसे- १) तुडतुडे, फुलकिडे, मावा लागल्यास, यावर औषधी:- फ्लोनीकॅमिड ५० डब्लूजी, याचे प्रमाण: २ ग्रॅम/10 लि.पाणी. किंवा बुफ्रोफेन्झीन २५ एससी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी किंवा डायफेन्थूरॅान ५० डब्लूपी, याचे प्रमाण: १२ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, याचे प्रमाण: ३ मिली/10 लि.पाणी किंवा फिप्रोनील ५ एससी, याचे प्रमाण: ३० मिली/10 लि.पाणी किंवा ऑसिफेट ७५ एससी, याचे प्रमाण: ८ ग्रॅम/ 10 लि.पाणी.
२)पांढरी माशी यावर औषधी:- डायफेन्थूरॅान ५० डब्लूपी, याचे प्रमाण: १२ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा बुफ्रोफेन्झीन २५ एससी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ एसएल, याचे प्रमाण: ३ मिली/10 लि.पाणी किंवा ऑसिफेट ७५ एससी, याचे प्रमाण: २० ग्रॅम/ 10 लि.पाणी किंवा फ्लोनीकॅमिड ५० डब्लूजी, याचे प्रमाण: २ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा पायरीप्रोक्झीफेन 10 ईसी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी
३)बोंड अळी:- यामध्ये शेंदरी बोंड अळी, ठिपक्यांची बोंड अळी व अमेरिकन बोंड अळी असे प्रकार असतात. यावर औषधी:- प्रोफेनोफॅास 10 ईसी, याचे प्रमाण: ३० मिली/10 लि.पाणी किंवा थायोडीकार्बे ७५ डब्लूपी, याचे प्रमाण: २० ग्रॅम/10 लि.पाणी किंवा इमामेक्टीन बेंझोएट ५ एससी, याचे प्रमाण: ४ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा स्पिनोसँड ४५ एससी, याचे प्रमाण: ४ मिली/10 लि.पाणी किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५ एससी, याचे प्रमाण: ३ मिली/10 लि.पाणी किंवा फ्लुबेंडामाईड २० डब्लूजी, याचे प्रमाण: ५ ग्रॅम/10 लि.पाणी किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ एससी, याचे प्रमाण: २.५ मिली/10 लि.पाणी किंवा नोव्हाल्यूरॉन 10 ईसी, याचे प्रमाण: २० मिली/10 लि.पाणी घ्यावे.
४)लाल्या:- यावर अ)पाण्याचा जमिनीतून योग्य निचरा करून जमीन वापसा स्थितीमध्ये ठेवणे. ब)डवरणी करावी. क)मॅग्नेशीयम सल्फेटची फवारणी करावी. ड)पानावरील रस शोषण करणाऱ्या कीटकांचे(तुडतुडे, फुलकिडे) योग्य व्यवस्थापन करणे. (ईमिडाक्लोप्रीड १७.८ एसएल ३ मिली/10 लि.पाणी) घ्यावे.
वरील प्रमाण हे साध्या पंपासाठी असून पॉवर स्प्रे पंपाकरिता प्रमाण तिप्पट करावे. तसेच किटकनाशकाची फवारणी करतांना फवारणी कीट किंवा तोंडाला रुमाल व अंगावर पूर्ण कपडे घालून फवारणी करावी. व आपल्या आरोग्याची किटकनाशकाच्या होणाऱ्या दुष्परीनामापासून काळजी घ्यावी. याबाबत शेतकरी बंधूंना कृषी सहाय्यक श्री. पी.पी. पेन्दोर यांनी आव्हान केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!