Vidarbh24News

Latest Online Breaking News

पालकमंत्री ना विजय वडेट्टीवार यांचे वतीने ब्रम्हपुरी नगर परिषद येथील सफाई कामगारांना मास्क,सॅनिटायझर व होमिओपॅथिक औषधीचे वाटप

पालकमंत्री ना विजय वडेट्टीवार यांचे वतीने ब्रम्हपुरी नगर परिषद येथील सफाई कामगारांना मास्क,सॅनिटायझर व होमिओपॅथिक औषधीचे वाटप

  • ब्रम्हपुरी:–
    कोरोना विषाणूचा पादुर्भाव लक्षात घेता ब्रम्हपुरी नगर परिषद हद्दीत साफसफाई करीत असताना सफाई कामगारांचे कोरोना विषाणू पासून संरक्षण व्हावे यासाठी पालकमंत्री ना विजय वडेट्टीवार यांच्याकडून सर्व सफाई कामगारांना मंगळवार दि 4 ऑगस्टला शासकीय विश्रामगृह येथे मास्क, सॅनिटायझर,तसेच होमिओपॅथी औषधीचे वाटप करण्यात आले
    सदर सफाई कामगारांनी कोरोना विषाणूची तमा न बाळगता दैनंदिन आपले कर्तव्य पार पाडले लॉकडाऊन काळात सुद्धा त्यांनी अविरत सेवा देत ब्रम्हपुरी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यात मोलाची भूमिका बजावली आहे आणि म्हणून सदर सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले आद्यकर्तव्य ठरते असे समजून पालकमंत्री ना विजय वडेट्टीवार यांनी सफाई कामगारांचे आरोग्य व्यवस्थित राहावे त्यांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक होमिओपॅथी औषधीचे,मास्क,सॅनिटायझर यांचे वाटप केले
    याप्रसंगी न प गटनेते तथा बांधकाम सभापती विलास विखार,पं स सदस्य थानेश्वर कायरकर,मंगलाताई लोनबले, योगिता आमले, नियोजन सभापती अँड बाला शुक्ला, आरोग्य सभापती प्रीतेष बुरले,नगरसेवक महेश भर्रे,हितेंद्र राऊत,नगरसेविका नीलिमा सावरकर,सुनीता तिडके, सरिता पारधी ,वनिता अलगदेवें ,लताताई ठाकूर आदि मान्यवर उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!