Vidarbh24News

Latest Online Breaking News

नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने आपदग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या वतीने आपदग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत

ब्रम्हपुरी/
ब्रम्हपुरी तालुक्यातील तळोधी(खुर्द) येथील शेतकरी नितीन मारबते हे आपल्या शेतावरील पिकाला पाणी देण्यासाठी गेले असतांना कृषीपंपाचा विद्यूतशाँक लागुन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत ब्रम्हपुरी येथे कोरोना आढावा बैठकीसाठी आलेले राज्याचे बहुजन कल्याण तथा मदत, पुनर्वसन मंत्री नाम. विजयभाऊ वडेट्टीवार यांना याबाबत माहिती मिळाली. तेव्हा तात्काळ विजय वडेट्टीवार हे तळोधी(खुर्द) येथे सदर शेतकऱ्याच्या घरी जाऊन कुटुंबियाची भेट घेत आस्थेने विचारपुस केली. व कुटुंबियांना आर्थिक मदत दिली.
सोबतच गावातील कार्यकत्यांसोबत चर्चा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून सदर शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी तात्काळ कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगितले.
यावेळी तालुका कांग्रेस कमेटिचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, कार्याध्यक्ष प्रभाकर सेलोकर, जि.प. सदस्य प्रमोद चिमुरकर, न.प. गटनेता विलास विखार, नगरसेवक महेश भर्रे, उमेश धोटे, सुधीर पंदिलवार हे उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!