पोलिस स्टेशन सिंदेवाही येथे रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न
विदर्भ 24 न्यूज
२४ तास जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत, त्यांच्याप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करून सिंदेवाही पोलिस स्टेशन येथे निशिकांत रामटेके पोलीस निरीक्षक यांच्या सहकार्याने- पोलीस उपनिरीक्षक अरविंद नेरकर, पाटील व इतर पोलिस कर्मचारी यांना सिंदेवाही तालुका महिला कॉंग्रेस कमेटी तर्फे बहिणीपासुन व घरापासुन दुर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी पौर्णिमेनिमित्त राखी बांधुन भावा बहीणींचा नात कायम ठेवलेत.
सिंदेवाही तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. सीमाताई सहारे यांच्या मार्गदर्शनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाकरिता सिंदेवाही नगर पंचायतच्या अध्यक्ष आशाताई गंडाटे यांची उपस्थिती होती.तसेच नंदाताई नरसाळे, लताताई गेडाम,शहर अध्यक्ष लक्ष्मीताई पेदूरवार आणी बरेच कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.



