चंद्रपूर:जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी रहमतनगर येथील रहिवासी कोरोना आजारामुळे मृत्यु
ब्रेकिंग न्यूज
चंद्रपूर:जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी
रहमतनगर येथील रहिवासी कोरोना आजारामुळे मृत्यु
आज 1 ऑगस्टला जिल्ह्यात कोरोनाचा पहिल्या बळी गेला. हा कोरोनाबाधित 2 दिवसआधी अमरावती जिल्ह्यातून चंद्रपूर मध्ये आला होता, ज्यावेळी तो आपल्या जिल्ह्यात दाखल झाला त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर असल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले,
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज 1 ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात कोरोना आजारामुळे 42 वर्षीय बाधिताचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जुलै या 42 वर्षीय युवकाला चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाखल करण्यात आल्यापासून हा रुग्ण ऑक्सिजनवर होता. आज दुपारी दीडच्या सुमारास या रुग्णाचा मृत्यू झाला.
चंद्रपूर शहरातील रहमत नगर येथील रहिवासी असणारा हा रूग्ण 30 जुलैला रात्री अकरा तीस वाजता दाखल झाला होता. 30 जुलैला गंभीर अवस्थेत रात्री 11:30 वाजता या बाधिताला दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात बाधिताच्या परिवाराला माहिती देण्यात आली असल्याचे आरोग्य यंत्रणेने स्पष्ट केले आहे.



