शहीद सुरेश पाटील सुरकर विद्यालय कवठी चा निकाल 86.66%
शहीद सुरेश पाटील सुरकर विद्यालय कवठी चा निकाल 86.66%
कवठी प्रतिनिधी
सावली तालुक्याजवळ असलेल्या कवठी येथील शहीद सुरेश पाटिल सुरकर विदयालयाचा माध्यमिक शालांत परिक्षेचा उत्कृष्ट निकाल लागला.निकालाची टक्केवारी 86.66 टक्के इतकी आहे. 30 पैकी 26 विदयार्थ्यांनी भरभरून यश संपादन केले. तनुजा अनिल गेडाम या विदयार्थीनीने 87.40 टक्के गुण घेऊन विदयालयातून प्रथम आली. मानसी ताराचंद नायबनकार या विदयार्थीनीने 84.80 टक्के गुण घेऊन द्वीतीय तर मेहेक दिवाकर शेंडे आणि साहिल गोपाल शनगनवार या विदयार्थ्यांनी 81.20 टक्के गुण घेऊन विदयालयातून तृतीय क्रमांक पटकाविला. विशेष प्राविण्यासह सहा तर बारा विदयार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होवून घवघवीत यश संपादन केले. विदयालयातील सर्व गुणवंत आणि यशवंत विदयार्थ्यांचे घरी जाऊन विदयार्थ्यांसह त्यांच्या पालकांचे अभिनंदन करण्यात आले.
मुख्याध्यापक श्री.के.व्ही.खोब्रागडे सर यांनी सर्व यशस्वी विदयार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सहा.शिक्षक श्री.व्ही.डी.हजारे श्री.वि.ओ.रेकलवार,श्री.एम.एन.डोंगरे,कु.एल.के.सलामे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी श्री.जे.एल . वनकर,ए.टी.ठाकूर,श्री.आर.एम.अर्जूनकार,श्री.एस.एम.टेप्पलवार आदींची यावेळी उपस्थिती होती. विदयालयाच्या विदयार्थ्यांंनी घवघवीत यश संपादन केल्याबददल शहीद सुरेश पाटिल सुरकर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री.चिंतामण पाटिल तिमाडे , सचिव श्री.तुकाराम पाटिल सुरकर आणि पदाधिका—यांनी गुणवंताचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.



