Vidarbh24News

Latest Online Breaking News

लैंगिक समानतेसाठी महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी देने आवश्यक-डॉ. संदीप तुडूंरवार.

आशिष यमनुरवार विदर्भ२४ न्युज राजुरा शहर/ तालुका ८८५५९९४००१

*लैंगिक समानतेसाठी महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी देने आवश्यक-डॉ. संदीप तुडूंरवार*
गडचांदूर:आजही आपल्या भारतातील
धर्मव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्थेमध्ये महिलांना दुय्यम स्थान दिले जाते.भारतातील स्त्री-पुरुष लैंगिक समानता प्रस्थापित करण्यासाठी पारंपरिक पुरुषप्रधान मानसिकता बदलणे गरजेचे आहे .संविधानामध्ये प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार दिलेला असून प्रत्येक महिलांना शिक्षित करणे गरजेचे आहे .महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न असो की अधिकाराचा असो समाजातील सर्व घटकांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे. महिलांच्या सबलीकरणासाठी आणि लैंगिक समानतेसाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रात समान संधी देणे गरजेचे असल्याचे मत प्रमुख तज्ञ मार्गदर्शक व बिंझाणी नगर महाविद्यालय नागपूर येथील *राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप तुडूंरवार* यांनी याप्रसंगी केले. शरदराव पवार महाविद्यालय गडचांदूरच्या गुणवत्ता हमी कक्ष व राज्यशास्त्र आणि इतिहास विभागाच्या वतीने *लैंगिक समानता आणि महिला अधिकार* या विषयावर ऑनलाइन राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन करण्यात आले होते.या वेबिनार च्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ आनंदराव अडबाले हे होते तर वेबिनरचे चे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांनी केले याप्रसंगी दुसरे तज्ञ मार्गदर्शक व यशवंत महाविद्यालय सेलू येथील *राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संदीप काळे* म्हणाले महिलांना शिक्षण देणे गरजेचे आहे तेव्हाच त्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव होईल. समाजव्यवस्था आणि कुटुंबववस्था टिकविण्यात महिलांचे महत्त्वाचे योगदान असून संस्काराची जपवणूक करण्याचे मोठे काम महिलांनी केले आहे. त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरते.याप्रसंगी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह यांनी पुरुष आणि महिलांना समान संधी प्राप्त व्हावी त्यासाठी समाजाला जागृत करण्याची गरज असून समाजाच्या विकासात महिलांची भूमिका असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले यावेळी वेबिनार चे आयोजक राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. संजय गोरे यांनी या ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनार च्या आयोजनाची भूमिका विशद करून नारी शक्ती च्या कर्तुत्वाचा आणि कार्याचा समाजात सन्मान झाला पाहिजे असे मनोगत केले या राष्ट्रीय वेबिनार करिता महाराष्ट्रातील प्राध्यापक, शिक्षक आणि विध्यार्थी असे एकूण 690 सदस्यांनी ऑनलाईन नोंदणी केलेली होती.या राष्ट्रीय वेबिनार ला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला या वेबिनारचे आभार प्रदर्शन सह आयोजक व इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ शरद बेलोरकर यांनी मानले. वेबिनार च्या यशस्वीतेसाठी प्रा. मंगेश करंबे,प्रा.डॉ. सतेंद्र सिंह व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!