Vidarbh24News

Latest Online Breaking News

देसाईगंजमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाचा संसर्ग

देसाईगंजमध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांना कोरोनाचा संसर्ग

विदर्भ 24 न्यूज़
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली/देसाईगंज:- शहरातील डॉ.आंबेडकर वॉर्डात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कातील पुन्हा ५ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. हे पाचही जण एकाच कुटुंबातील आहेत. शिवाय आरमोरी येथील दोन व भामरागड येथील एक जण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे. दोन दिवसांपूर्वी देसाईगंजच्या डॉ.आंबेडकर वॉर्डातील एका इसमास कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर या रुग्णाच्या संपर्कातील २३ व्यक्तींची रॅपिड कोरोना एंटिजन तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असून, त्यात रुग्णाची पत्नी, भाऊ, आजी व इतर सदस्यांचा समावेश आहे. या कुटुंबातील काही सदस्य अमरावती येथे जाऊन आले होते. तसेच आरमोरी येथील दोघांचे कोरोना नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. हे रुग्ण पुणे व दिल्ली येथून आले आहेत. भामरागड येथील विलगीकरणातील एका व्यक्तीही कोरोनाबाधित आढळून आला आहे. जिल्ह्यात ४ जण कोरोनामुक्त जिल्ह्यात आज चार रुग्ण कोरोना आजारातून बरे झाले. त्यात चामोर्शी तालुक्यातील दोघे आणि गडचिरोली येथील दोन एसआरपी जवानांचा समावेश आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७१ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, त्यात तब्बल ४०७ रुग्ण हे सुरक्षा दलाचे जवान आहेत. एकूण ५७१ रुग्णांपैकी ३३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या २३३ सक्रिय रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत.

बातम्या,लेख व जाहिरातसाठी संपर्क साधा
      🖋️ दिपक बोलीवार
जिल्हा प्रतिनिधी गड़चीरोली
          9422645343

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!