*उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल*
*उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल*
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल उद्या (बुधवार) दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
अधिकृत वेबसाइट :
▪️ mahahsscboard.maharashtra.gov.in
▪️ mahresult.nic.in
▪️ www.sscresult.mkcl.org
▪️ www.maharashtraeducation.com
ऑनलाइन निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून विद्यार्थ्यांना श्रेणीव्यतिरिक्त कोणत्याही अनिवार्य विषयांची गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती आणि पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
महत्त्वाच्या तारखा :
▪️ गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते ८ ऑगस्ट २०२०
▪️ छायाप्रतीसाठी अर्ज करण्याची मुदत – ३० जुलै २०२० ते १८ ऑगस्ट २०२०
▪️ श्रेणीसुधार योजना : मार्च २०२० परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोन संधी श्रेणी / गुणसुधार योजनेसाठी उपलब्ध राहतील. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना आपला निकाल सुधारायचा असेल ते विद्यार्थी लगतच्या दोन परीक्षा देऊन आपली टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न करू शकतील.



