साखरी येथे आढळला सिरसी येथील इसमाचा मृत्युदेह ……
साखरी येथे आढळला सिरसी येथील इसमाचा मृत्युदेह ……
सावली ( लोकमत दुधे )
सावली तालुक्यातील साखरी गावात एका इसमाचा मृत्युदेह दुपारच्या सुमारास आढळला.या घटनेची माहिती त्याच्या घरातील व्यक्तीला कळताच देहाची पाहणी केली त्यामुळे मयत व्यक्तीची ओळख पटली आहे.मयत व्यक्ती सिरसी येथील मनोहर कवडु ठाकुर वय ५५ वर्षे असे आहे. सदर घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून घटनेची चौकशी करण्यात आली.मयत व्यक्ती ही दोन दिवसापासून जेवण न केल्याचे सांगितले जात आहे तर त्याला दारूची शौक असून दारू पिऊन असल्यामुळे आणि पोटात अन्न नसल्यामुळे व कडाक्याची ऊन असल्यामुळे मृत्यु झाल्याचे म्हटले जात आहे.
सदर मृत्युदेह पोस्टमाटम करीता सावली येथे पाठविले असून पुढील तपास सावली पोलीस करीत आहेत.



