Vidarbh24News

Latest Online Breaking News

गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्या पैकी ११ तालुके कोरोनामुक्तीच्या मार्गावर..

अकरा तालुक्यात १३१ रूग्णांपैकी १०८ कोरोनामुक्त , उरले फक्त २२ सक्रिय

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्हयात तीन तालुक्यात एकही सक्रिय रूग्ण नाही तर पाच तालुक्यात एक ते दोन सक्रिय रूग्ण आहेत. उर्वरीत तीन तालुक्यात सहा किंवा सहा पेक्षा कमी रूग्ण सक्रिय आहेत. त्यामूळे गडचिरोली जिल्हयातील १२ तालुक्यांपैकी ११ तालुके कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत. जिल्हयातील एकुण सक्रिय २५१ रूग्णांपैकी २२९ एकटया गडचिरोली तालुक्यातील आहेत. यामध्ये सुरक्षा दलातील कोरोना बाधित जवानांचा समावेश मोठया प्रमाणात आहे . इतर तालुक्यात फक्त २२कोरोना बाधित सद्या उपचार घेत आहेत . गडचिरोली सोडून इतर ११ तालुक्यात आत्तापर्यंत बाहेरून आलेले १३१ रूग्ण कोरोना बाधित आढळून आले होते. त्यापैकी १०८ रूग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहेत. उर्वरीत सर्व रूग्ण सद्या लक्षणे नसलेले असून ; तेही लवकरच कोरोनामुक्त होतील असा विश्वास आरोग्य विभागाने वर्तविला आहे. कोरोना कोविड सेंटर ( सीसीसी ) वडसा येथे ३ , अहेरी सीसीसी ० , सिरोंचा सीसीसी १, चामोर्शी सीसीसी ४ , कुरखेडा सीसीसी २ , धानोरा सीसीसी ६, मुलचेरा सीसीसी ०, एटापल्ली सीसीसी १, भामरागड सीसीसी २ तर गडचिरोली येथील वेगवेगळया तीन कोविड -19 दवाखान्यात २२९ रूग्णांवर उपचार सुरू आहेत . अहेरी , आरमोरी व कोरची या तालुक्यात एकही कोरोना रूग्ण सद्या उपचारात नाही . जिल्हयात ४२९ रूग्णांपैकी १७७ रूग्णांनी आत्तापर्यंत कोरोनावर यशस्वी मात केली आहे . तर सिरोंचा मधील एका रूग्णाचे निदान व दुदैवी मृत्यू हैद्राबाद येथे झाला आहे . एकूण ४२९ कोरोना बाधितांमध्ये २९३ सुरक्षा दलातील जवानांचा समावेश आहे ते सर्व जवान जिल्हयाबाहेरून बाधित होवून आले असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे . यामध्ये राज्य राखीव दल २०१, केंद्रीय राखीव दल ८८ , बीएसएफ २ व पोलीस २ अशा प्रकारे जवानांचा समावेश आहे . तसेच एकूण ४२९ रूग्णांपैकी राज्याबाहेरील ८३, जिल्हयाबाहेरील २१० व बाहेरून आलेल्या परंतू स्थानिक १३६ नागरिकांचा समावेश आहे.
जिल्हयात १२ हजार कोरोना चाचण्या : जिल्हयात इतर जिल्हयांच्या लोकसंख्येच्या तुलनेत मोठया प्रमाणात कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.आत्तापर्यंत ११९९३ चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये आरटीपीसीआरीसह इतर टुनॅट ७४० व RATI ३९ तपासण्यांचा समावेश आहे. यापैकी ११२८८ चाचण्या नकारात्मक आलेल्या आहेत. चाचण्यांच्या जास्त संख्येमूळे कोरोना बाधित रूग्ण तातडीने शोधण्यास मदत होते . यातून जिल्हयात कोरोना संसर्गावर वेळेत नियंत्रण ठेवण्यात प्रशासनाला यश येत आहे.

जिल्हयात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कडक निर्बंध लागू राहणार : दीपक सिंगला

जिल्हयात कोरोना संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बध पुढेही लागूच राहणार आहेत . यामध्ये जिल्हयाबाहेरील नागरिकांचा विनापरवाना प्रवेश जिल्हयात होवू दिला जाणार नाही . यामूळेच गेल्या काही आठवडयांमध्ये ग्रामीण भागात आलेल्या प्रवाशांना विलगीकरणात ठेवून प्रशासनाला कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवण्यात यश मिळाले आहे . जिल्हयात सुरक्षा दलाचे जवान दरवर्षीप्रमाणे विविध ठिकाणांहून येत असतात . मात्र यावेळी ते कोरोना बाधित क्षेत्रामधून कर्तव्य पार पाडून जिल्हयात दाखल झाले . आल्यानंतर त्यांना स्वतंत्र विलगीकरणात ठेवण्यात आले होते . प्रशासन सुरक्षा दलाच्या जवानांबाबत आवश्यक खबरदारी घेत आहे . गडचिरोली शहरातील नागरिकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. परंतू कोरोना संसर्ग होवू नये म्हणून सर्वांनी आवश्यक काळजी घ्यावी.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!