Vidarbh24News

Latest Online Breaking News

अंगावर वीज पडून बालकासह इसमाचा मृत्यू : एक बैलहि ठार*

*अंगावर वीज पडून बालकासह इसमाचा मृत्यू : एक
बैलहि ठार*

चामोर्शी तालुक्यातील दुगापूर,सोमनपुर व धर्मपुर येथे काल २२ जुलै रोजीसायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वीज पडून एका
बालकासह इसम व एक बैल ठार झाला तर
एकजण जखमी झाल्याची झाल्याची घटना घडली.
दुगापूर येथे शेतात काम करीत असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास रुपेश उपेन बाच्याङ (१६) याच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला. येणापूरचे
तलाठी बाविस्कर यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. तर दुसऱ्या घटनेत सोमनपुर
येथे शेतात काम करीत असताना भैय्याजी राघोबा मडावी (४२) यांच्या अंगावर
वीज पडल्याने ते जागीच ठार झाले तर जयश्री जोतिन आत्राम (३२) हि महिला
जखमी झाली. तिला अडपल्ली प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी
हलविण्यात आले. या घटनेचा पंचनामा तलाठी नागरगोटे यांनी केला. तर तिसऱ्या
घटनेत धर्मपुर येतील काशिनाथ दसरु आत्राम यांचे शेतात बैल चारत असताना
दुपारी ३ वाजताच दरम्यान वीज पडल्याने बैलाचा मृत्यू झाला. सदर घटनेचा
पंचनामा वायगावचे तलाठी नितीन मेश्राम यांनी केली. तिन्ही घटनेतील मृतकांना व
जखमींना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून
होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!