हळदा येथून पाथरी अंतर्गत गावात सर्रास दारूचा पुरवठा …..
हळदा येथून पाथरी अंतर्गत गावात सर्रास दारूचा पुरवठा …..
*पालेबारसा ; अंतरगाव ; बोरमाळा गावे दारूविक्रीचे बनत आहे केंद्र *
* संबंधित विभागाचे दुर्लक्ष *
*सणासुदीच्या काळात येणार दारूविक्रीला उधाण *
सावली ( लोकमत दुधे )
बंदीच्या काळापासून पाथरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत आसलेल्या गावात ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथून सर्रास दारू चा पुरवठा केला जात असल्याने पाथरी अंतर्गत येत आसलेल्या गावात दारू विक्रीला ऊत येत आहे मात्र अश्या गंभीर बाबीकडे सबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने दारू विक्रेत्यांचे फावले जात आहे तालुक्याचे शेवटचे टोक ब्रम्हपुरी लागत हळदां नजिक असल्याने मुळझा ते ब्रम्हपुरी सोबतच झुप्या मार्गाने हळदा येथून दारूचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे सावली तालुक्यातील पाथरी अंतर्गत गावात दारू विकरीला ऊत येत आहे एक एप्रिल पासून जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी करण्यात आली आजच्या घडीला चार वर्षाचा कालखंड लोटला असतानासुद्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही सर्रास दारू ची विक्री सुरू आहे अनेक कार्यवाही ला न जुमानता आंत्तर जिल्हा अंतर्गत विना नंबरप्लेटच्या चार चाकी दुचाकी वाहनांच्या साहायाने भरधाव वेगात दारूची वाहतूक आळ मार्गाने केली जात आहे त्यामुळे ग्रामीण भागात देशी विदेशी चा महापूर सुरू असल्याचे चित्र निर्माण होत आहे नुकतेच सणासुदीच्या काळाला सूर्वात झाली असून या काळात दारू पुरवठा आणि विक्रीला उधाण येतं आहे त्यामुळे दारू विक्रेत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसते दारू बंधी नंतर दारूच्या विरोधात आवश्यक ती यंत्रणा च उभारण्यात न आल्याने त्याचा फायदा अवैध दारू विकरेत्याणा होत आहे परिणामी दारू विक्रेत्यांच्या संख्येतही वाढ होताना दिसते त्यामुळे या भागात पालेबरसा ; अंतर्गाव ; बोर माळा ही गावे दारू विक्रीचे केंद्र बनत आहे राज्यात सतांतर झाल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी व्हावी याबाबत निर्णय घेण्यात आला अनेक सामाजिक संघटनांनी दारू बंदी साठी आंदोलने केली आणि जिल्ह्यात दारू बदी झाली परंतु बंदी नंतर अल्पावधीतच दारूच्या अवैध विक्रीला उधाण आले दारूमुळे कालोळ मजू न गावातील शांतता सुवेवस्था बिगळू नये सामान्य जनतेचे संसार दारूमुळे उद्दवस्त होऊ नये आदी कारणास्तव जिल्ह्यात दारू बंदीचा निर्णय घेण्यात आला होता मात्र बंदीला अल्पावधीतच ग्रहण लागून अवैध दारू विक्रीचा सपाटा सुरू झाला पाथरी अंतर्गत पालेबारसा ; बोरमाळा ; अंतर गाव ही गावे दारू विक्रीची केंद्रे बनत असून ब्रहम्पुरी तालुक्यातील हळदा येथून देशी विदेशी दारूचा पुरवठा सदर गावाला केला जात असल्याचे बोलले जात आहे तेव्हा या भागातील दारू पुरवठा दार आणि दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. ……
………………………………….
तालुक्यात दारूचा माहपुर सुरू आहे सणासुदीच्या काळात दारूला उधाण येणार असताना पोलीस विभागाने आपली जबाबदारी समजून त्यावर कारवाही करावी ..
सभापती …विजय कोरे वारं



