राज्यात यापुढे लॉकडाऊन नाही, याबद्दल आरोग्य मंत्री यांची मोठी घोषणा..
राज्यात यापुढे लॉकडाउन नाही, याबद्दल आरोग्य मंत्री यांची मोठी घोषणा……..
आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मोठी घोषणा….
दि. 27 जून :- राज्यात यापुढे लॉकडाउन राहणार नाही तर यापुढे अनलॉक दोन ते तीन असणार आहे, अशी मोठी घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पुण्यात केली आहे. महाराष्ट्रात करोनाचे रुग्ण दिवसेंदीवस वाढत आहेत याची फारशी चिंता नाही, तर राज्यात दिवसेंदीवस मृत्यूची संख्या वाढत आहे त्याची चिंता अधिक आहे असेही आरोग्य मंत्र्यांनी स्पष्ट केले.
जून आणि आगस्टमध्ये राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन आयसीयू बेड्स आणि डॉक्टर म्हणजेच आपले करोना योध्दे यांची संख्या वाढवत आहोत. फक्त एवढंच नाही तर राज्यातील कुठलेच करोना मृत्यू आम्ही लपवित नाही, तर करोनाचा मृत्यू दर वाढणार नाही याचीही सर्वतोपरी काळजी आम्ही घेत आहोत, असंही टोपे यांनी म्हटलं आहे.
पुणे आणि सोलापूरात करोना रुग्ण वाढत आहेत हे राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मी आणि अनिल देशमुख याबाबत आढावा घेत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केल. मुंबई व पुणे शहरात प्रत्येकी एक ऑटीजेन चाचण्या घेण्यात येणार आहेत, व त्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी केली.



