*विरूर स्टेशन- अवैध रेती तस्करीच्या विरोधात शिवसेना विरूरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
*विरूर स्टेशन- अवैध रेती तस्करीच्या विरोधात शिवसेना विरूरच्या वतीने तहसीलदारांना निवेदन*
विरूर परिसरात होत असलेल्या अवैध रेती तस्करीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने तहसीलदार मा.होळी साहेब यांना लेखी निवेदनातून कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
विरूर स्टेशन भागातील खांबाला नाल्यावरून अवैध रेती तस्करी रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात चालू आहे. अश्या अवैध रेती तस्करीमुळे शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडत आहे. या बाबतची संपूर्ण माहिती घेऊन आज शिवसेना विरूरचे नवनियुक्त विभाग प्रमुख तुषार मोरे, सुरज नगराळे महेशभाऊ चन्ने राजुरा आणि शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांनी निवेदनाद्वारे होत असलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली आणि या प्रकारावर लवकरात लवकर लक्ष घालून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.



