Vidarbh24News

Latest Online Breaking News

बेरोजगार उमेदवारांनी महास्वयम संकेतस्थळावर नोंदणी करावी

 

 

 

बेरोजगार उमेदवारांनी महास्वयम संकेतस्थळावर नोंदणी करावी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे आवाहन

चंद्रपूर, दि.24 जून: कोविड-19 मुळे लॉकडाऊन घोषित केलेले असल्यामुळे जिल्ह्यातून बरेच परप्रांतीय कामगार स्वगावी परत गेले आहे. त्यामुळे ज्या बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची आवश्यकता आहे. तसेच कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने नोंदणी केलेली नाही.त्यांनी ऑनलाईन पध्दतीने नोंदणी करावी,असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी नोंदणी केलेली आहे. त्यांनी आपली प्रोफाईल अद्यावत (जसे- संपूर्ण शैक्षणिक पात्रता,अनुभव,अवगत असलेल्या भाषा,स्किल इ) करावी. ऑनलाईन पध्दतीने जून्या व नविन नोंदणी केलेल्या सर्व उमेदवारांनी आपला युझर आयडी व पासवर्डने लॉगीन करुन वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांचे अवलोकन करावे.स्वतःच्या शैक्षणिक पात्रता व अनुभवानुसार योग्य पदाकरीता त्या कंपनीकडे ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावा. सदर नोंदणी ही विनामुल्य आहे. अधिक माहितीसाठी, काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,प्रशासकीय भवन, पहीला माळा, हॉल क्र.5/6 चंद्रपूर या कार्यालयाशी किंवा 07172- 252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!