हरांबा-सावली मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी

हरांबा-सावली मार्गाची दुरुस्ती करण्यात यावी-राकेश एम गोलेपल्लीवार सामाजिक कार्यकर्ता
उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सावली येथे निवेदन देऊन केली मागणी
सावली ते हरांबा मुख्य रस्त्यात अनेक जीवघेणे खड्डे पडले असून अनेक लोक जिव मुठित घेऊन प्रवास करीत आहेत.पावसाळ्याच्या दिवसात खड्डे जलमय होऊन असल्याने पाण्यामुळे दिसत नाही आणि अपघात होण्याची शक्यता जास्त असते.त्यामुळे या मुख्य मार्गाची लवकर दुरुस्ती व्हावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते राकेश एम गोलेपल्लीवार यांनी बांधकाम विभाग उपअभियंता यांना निवेदनातून मागणी केली आहे. सध्या पावसाळा सुरु असुन सदर रस्त्याची दैनावस्था झालेली आहे.त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.सावली ते हरांबा मुख्य मार्गाने सावली येथील बाजारपेठेकरीता डोनाळा पासुन ते सिदोळापर्यंत चे नागरीक आपल्या सोयीनुसार येत असतात.परंतु या मार्गावर मोठमोठे खड्डे असुन या मार्गाने जडवाहतुक सुध्दा जास्त प्रमाणात आहे.त्यामुळे सावली ते हरांबा या रस्त्याची दैनावस्था झालेली आहे.
‘सदर कामाला त्वरीत सुरवात करुन सावली ते हरांबा मार्ग दळणवळणासाठी दुरुस्ती करुन देण्यात यावा.जेणेकरुन कोणताही अपघात होणार नाही.येत्या आठ दिवसात सदर मागांची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा हरांचा ते सावली मार्ग आम्ही कायमचा बंद करुन मोठे आंदोलन उभारू,याकरीता सर्वस्वी जबाबदार आपल्या विभागाची राहील याची नोंद घ्यावी,असेही निवेदनात म्हटले आहे.
राकेश एम गोलेपल्लीवार याचे नेत्तुवात निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी उपस्थित अमोल देहलकार, शिवनाथ खोबे, कवडुजी डाकोटे, नथुजी राऊत, देवा बावणे व आदि उपस्थित होते त्यावेळी निवेदन सादर करण्यात आले