चंद्रपूर घुग्घुस मार्गावर लूटमार करण्याचा प्रयत्न

*चंद्रपूर घुग्घुस मार्गावर लूटमार करण्याचा प्रयत्न*
*दोन आरोपीना अटक. आरोपी चंद्रपूरचे*
(घुग्घुस):चंद्रपूर कडून घुग्घुस ला दुचाकी वाहनाने येत असताना इरई नदी दरम्यान घुग्घुसच्या एका रेल्वे कर्मचाऱ्याला दुचाकी थाबवून अज्ञात तीन आरोपीने मारहाण करून लुटण्याचा पर्यत केला व त्याचे डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला मात्र डोक्यावर हेल्मेट असल्याने बचावला घुग्घुस रेल्वेत कार्यरत लोको पायलट अरुणराजू मलया जुमडे वय 52 हा सोमवारच्या रात्री एकदीड वाजता च्या दरम्यान दुचाकीने घुग्घुस ला कर्तव्यावर येत असताना इरई नदी जवळ रस्त्यावर तीन अनोळखी इसमाने अडविले व त्याच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला मात्र डोक्यात हेल्मेट असल्याने तो बचावला व पडोली मार्गे घुग्घुस ला आला .आज सकाळी पडोली पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार नोंदविली ठाणेदार एम एम कासार यांनी फिर्यादी कडून त्या अनओळखी इसमाचे वर्णन तपासात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिले असता पोलीस उप निरीक्षक सचिन यादव यांनी तपास चक्रे फिरवून अवघ्या काही तासात दुर्गापूर येथील मोहम्मद राहील मोहम्मद मकसूद 27 रा.स्नेहानगर व राहुल अरुण बोंदरे 31 रा. दुर्गापूर यांना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहे.जिल्हा पोलिस अधिक्षक डाँ महेश्वरी रेड्डी,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे,उप विभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्यामार्गदर्शना खाली ठाणेदार एम एम कासार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उप निरीक्षक सचिन यादव,सुरेंद्र खाडे, स्वप्नील बुरुले, शिषण टोन, सुनील वाकडे यांनी तपास करून गुह्यातील अनोळखी आरोपीला शोधून काढले .