चंद्रपूर शिवसेना शहर कार्यालयाला आग.
चंद्रपूर शिवसेना शहर कार्यालयाला आग.
चंद्रपूर शहर शिवसेना अध्यक्ष प्रमोद पाटील यांचे वर्कशॉप समोर अय्यप्पा मंदिर रोड वर असलेले शिवसेनेचे कार्यालयात आग लागली.या आगित पूर्ण साहित्य, पेपर खाक झाले.
आज संध्याकाळी ५-३० वाजता वाराधुन चालू असताना शिवसेनेचे कार्यालयातून आगिचे धुर निघतानी नागरिकांना दिसून आले . आज रविवार असल्यामुळे कार्यालय बंद होता. आग लागले असे दिसून येताच परिसरातील नागरिकांनी आगविझ वीण्याचे प्रयन्त केले . अग्निशामक दलाचे बंब मोक्यावर आले असता आग विझवीण्यात आली. शिव सेनेचे शहर अध्यक्ष प्रमोद पाटिल यांचे संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले. या आगित प्रथमदर्शनी अंदाजे तीन लाखाचे नुकसान झालेले दिसून येत आहेत. ही आग शॉट सर्किट मुळे लागली असावी अशी माहिती मिळली.



