Vidarbh24News

Latest Online Breaking News

आत्महत्या केलेल्या नवविवाहितेच्या चितेवर उडी घेऊन पतीनेही मृत्यूला कवटाळले

आत्महत्या केलेल्या नवविवाहितेच्या चितेवर उडी घेऊन पतीनेही मृत्यूला कवटाळले

* पत्नीपाठोपाठ पतीनेही मृत्यूला कवठाळले

* भंगाराम तळोधीतील घटनेने सर्वत्र हळहळ

* मृतक पत्नी तीन महिन्याची गर्भवती

चंद्रपूर- एकोणविस वर्षीय नवविवाहितेचा मृतदेह रविवारी आढळून आला.लाँकडाऊनच्या पाच दिवसापुर्वी तिचा विवाह झाला होता.ती तीन महिन्याची गर्भवती होती.आज(सोमवारी)तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू असतांना अचानक जळत्या चितेवर पती किशोर खाटीक यांनी उडी घेतली.यावेळी उपस्थित जमावानी किशोरला चितेबाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याने जमावाला न जुमानता चितेलगतच्या विहिरीत उडी घेतली.त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.नवविवाहित गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने देखिल स्वतःला संपविल्याची खळबळजनक घटना भंगाराम तळोधीत घडली.ह्या घटनेने अवघे समाजमन हादरले आहे.रुचिताचे वडील वारले होते.ती आईसह आजोबाकडे भंगाराम तळोधीला राहायची.अश्यातच आई अपंग असल्याने मामाने जोडीदार शोधून रुचिताचे लग्न मार्चमध्ये आटोपून घेतले होते.

File photo

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील रूचीता चिट्टावार हिचा विवाह १९ मार्च रोजी झाला होता.ती आपल्या पतीसह चंद्रपूरला वास्तव्यास होती.दरम्यान चार दिवसापुर्वी रूचीता भंगाराम तळोधी येथे माहेरी आली.रविवारी सायंकाळच्या सुमारास ती लोटा घेऊन बाहेर पडली.पण बराच वेळपर्यत घरी परतलीच नाही.यामूळे नातेवाईकांनी शोधाशोध सूरू केली.दरम्यान गावालगत असलेल्या विहीरीजवळ तिचा लोटा व चप्पल आढळून आली.यामूळे शंकेची पाल चुकचुकली.गोंडपिपरी पोलीसांना या घटनेची माहिती देण्यात आली.यावेळी शोधाशोध केली असता विहिरीमध्ये रूचीताचा मृतदेह आढळून आला.यामुळे कुटुंबियांना प्रचंड धक्का बसला.लाँकडाऊनच्या अगदी पुर्वीच तिचा विवाह झाला होता.ती तीन महिन्याची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली.रूचीताचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने विविध शंका उपस्थीत होत आहेत.गोंडपिपरीचे ठाणेदार संदीप धोबे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू असतांना आज(सोमवारी) तिच्यावर अंत्यसंस्कार सुरू होता.अचानक पेटत्या चितेवर पती किशोरने उडी घेतली.यावेळी जमावणी त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला.मात्र जमावाला न जुमानता स्वतःला संपविण्याच्या प्रयत्नात लगतच्या विहिरीत उडी मारली.यावेळी उपस्थितांनी आरडाओरड केली.त्याला वाचविण्याचा प्रयत्नही केला.पोलिसांना निरोप दिला.मात्र सारे प्रयत्न निष्फळ ठरले.आणि पत्नी रुचितासोबत पती किशोरने जगाचा निरोप घेतला.मन हेलवणाऱ्या या घननेनी सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!