असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज गडचिरोलीच्या वतीने वृद्धांना अन्नधान्य व फळांचे केले वाटप,
मानवतावादी उपक्रमात सहभागी होण्याची ईच्छा असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे..
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली :- दिनांक २० जून रोजी असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लाईज महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने वृद्धाश्रमात असलेल्या वृद्ध महिला व महिलांना ५ किलो तांदूळ , तेल पॉकेट , दाळ , मीठ पुडा , बेसन इत्यादीचा समावेश असलेली अन्नधान्याची किट्स वितरित करण्यात आले. तसेच आज पर्यन्त असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या माध्यमातून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी स्वीकारून गरजूंसाठी अन्नधान्य साहित्यांचे २०० किट्सचे वितरण, ७५ रक्तदात्यांकडून रक्तदान, गरजूंना वस्त्रदान इत्यादी साहित्यांचे वितरण करण्यात आले. तसेच धानोरा तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासीबहूल गावात लहान मुलांना बौद्धीक विकास साधण्याच्या दृष्टीने कंपास बॉक्स , रजिस्टर , इंग्रजी मराठीचे बाराखडी व अंकगणिताचे चार्ट आदी शैक्षणिक साहित्य , मानसिक विकास साधण्यासाठी खेळण्यांच्या साहित्याचे वितरण कुकूडकसा, सिंसूर, कोंडेखल, मिचगाव, पाथरगोटा, कचकल, गोटा,टोला व गुट्टा या गावातील २०० विद्यार्थ्यांना साहित्य व खेळणी वाटप करण्यात आले. सोबतच मातोश्री वृद्धाश्रम गडचिरोली येथील वृद्ध महिला व पुरुषांना फळांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात सुद्धा सहभाग दर्शवून वन वसाहत परिसरात पिंपळ व वडाच्या रोपांची लागवड करण्यात आली . याप्रसंगी असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लाईज महाराष्ट्र शाखा गडचिरोलीचे सदस्य सोनल भडके, सिद्धार्थ मेश्राम, धर्मराव दुर्गमवार,सिद्धार्थ गोवर्धन,सूरज ठाकूर,उमेश बोरावार,नितेश सोमलकर,भारत अल्लीवार, कमलेश भगत, रुपेश मेश्राम, किशोर सोनटक्के, संदीप रामटेके,रुपेश शेंडे, गोकुळ जल्लावार,वरुण बोरावार आदी उपस्थित होते. अशाप्रकारे भविष्यात सुद्धा असोसिएशन ऑफ प्रोग्रेसिव्ह एम्प्लॉईज महाराष्ट्र शाखा गडचिरोलीच्या वतीने उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे . या मानवतावादी उपक्रमात सहभागी होण्याची ईच्छा असल्यास भ्रमणध्वनी क्रमांक ८६०५९३९६९२,८२७५२८३६४१,९ ४०४१२६५१२,७७७३९४९००८ वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.



