सावलीत दुचाकींची भीषण टक्कर; एक ठार, तिघे गंभीर जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, सावली येथील अशोक मेश्राम (वय ६२) यांचा अपघातात मृत्यू झाला. तर गौरव मेश्राम सिंदोळा येथील (३०), ईश्वर बाबनवाडे (३५) आणि साहिल बाबनवाडे (२३) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दुचाकींची टक्कर इतकी भीषण होती की वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
या अपघातामुळे सावली परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांनी रस्त्यावर वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.