*हत्तीच्या कळपाने नुकसान केलेल्या धान पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरपाई द्या…*
“भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अविनाश पाल यांची मागणी”
*सावली*-गडचिरोली जिल्ह्यातुन वैनगंगा नदी ओलांडून २५ ते ३० हत्तींचा कळप सावली तालुक्यात दाखल झाला असून वनपरिक्षेत्रार्तंगत येणाऱ्या उपवन व्याहाड खुर्द क्षेत्रातील सामदा बिटातील शेतशिवारात धुडगुस करीत धानपिकांचे नुकसान करीत आहे, या परीसरातील अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले असून वनविभागाने नुकसान झालेल्या धानपिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ,अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पाल यांनी यांनी केली आहे.
सामद बुज वनबिटातील शेतशिवारात हत्तीच्या कळपाने अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे नुकसान केले आहे, सामदा बुज,उपरी,डोनाळा, गेवर्ला, रय्यतवारी आदी गावातील शेतकऱ्यांना धानपिकांचे नुकसान सोबतच पाण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जनरेटर ,पाईपलाईन आदीचे सुध्दा नुकसान हत्तीच्या कळपाने केले आहे त्या धानपिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे निवेदन अविनाश पाल यांनी दिले ,यावेळी वनसंरक्षक रामगावकर,सहाय्यक वनसंरक्षक परमेश्वर खेडकर,सावली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे आदी उपस्थित होते.