राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात माजी विद्यार्थी, पालक सभा व मार्गदर्शन सोहळा संपन्न
सावली – राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे दिनांक 28 सप्टेंबर 2024 ला माजी विद्यार्थी , पालक सभा व मार्गदर्शन सोहळा घेण्यात आला. या सभेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली हे होते. मार्गदर्शक डॉ. सचिन हेमके मनोविकार तज्ञ तर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वीरेंद्र गड्डमवार, सचिव सुरज बोमावार, माजी विद्यार्थी संघाचे सदस्य दिनकर मोर्हुले, कविश्वर लेनगुरे रोशन बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डॉ. सचिन हेमके यांनी जीवनातील ताण-तणावाच व्यवस्थापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या वाटचालीत माजी विद्यार्थी आणि पालक यांचे सहकार्य महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये माजी विद्यार्थ्यांचे अनुभव मार्गदर्शक स्वरूपाचे आहेत असे विचार याप्रसंगी डॉ.ऐ. चंद्रमौली यांनी व्यक्त केले या सभेत माजी विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयाच्या संदर्भात काही सूचना व मार्गदर्शन केले त्यांचा लाभ महाविद्यालयास नक्कीच होईल असा आशावाद प्राध्यापक विनोद बडवाईक यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे संचालन डॉ. रामचंद्र वासेकर तर आभार प्रा. साकेत बलमवार यांनी मानले.या सभेला माजी विद्यार्थी व पालक बहुसंख्येने उपस्थित होते.