राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात “स्वच्छता ही सेवा” उपक्रम राबविण्यात आला
सावली – राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे स्वच्छता ही सेवा” उपक्रम राबविण्यात आला महाविद्यालयातील परिसरात स्वच्छता करण्यात आली सदर कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. देविलाल वाताखेरे, डॉ. राजश्री मार्कंडेवार, रासेयो विभागीय समन्वयक डॉ. रामचंद्र वासेकर, डॉ. दिलिप कामडी, प्रा. प्रशांत वासाडे, श्री सोनटक्के, डॉ. प्रफुल्ल वैराळे, प्रा. संदिप देशमुख, डॉ. प्रेरना मोडक, प्रा. मुकेश निखाडे. प्रा. सचिन वाकडे आदि प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला.
बहुसंख्य विद्यार्थीनी सदरील उपक्रमात सहभाग येऊन परिसराची स्वच्छता केली.
महाविद्यालयात महात्मा गांधी जयन्ती निमित्य दिनांक 27 सप्टेंबर ते 02 आक्टोबर 2024 पर्यंत सप्ताह आयोजित करण्यात येत आहे त्याची सुरुवात स्वच्छतेनी केली.