विश्वशांती विद्यालयात शिक्षक दिन साजरा
विश्वशांती विद्यालयात शिक्षक दिन साजरा
सावली (प्रा. शेखर प्यारमवार )
भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावलीच्या वतीने आज ५ सप्टेंबर रोजी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,या कार्यक्रमाप्रसंगी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंशासन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, अनेक विद्यार्थ्यांनी आपल्यात असलेल्या गुणांचा वापर करून आपल्या आवडत्या शिक्षकाची भूमिका साकार करुन विद्यार्थ्यांना विद्यार्जन करण्याचे काम केले. तद्ननंतर समारोपीय कार्यक्रमात देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.विद्यालयाचे पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम अध्यक्षीय स्थानी होते.प्रमुख अतिथी म्हणून तसेच संपूर्ण कर्मचारी वृंद मंचावर उपस्थित होते.आपल्या अध्यक्षीय भाषणातून पर्यवेक्षक सुधाकर मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हणतात की, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी शिक्षकांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून कार्य पुढे चालू ठेवावे.कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक शिक्षक धर्मेंद्र दुधे,संजय ढवस, धनंजय गुरनुले,श्वेता खर्चे,अशोक लांजेवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाची विद्यार्थिनी अनुष्का येलट्टीवार यशस्वी ठाकूर,तर आभार तृप्ती काटपल्लीवार हिने मानले. …..