भारतीय ज्ञान प्रणालीवर कार्यशाळा संपन्न.

सावली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली यांच्या संयुक्त विद्यमाने इडियन नॉलेज सिस्टीम (भारतीय ज्ञान प्रणाली) या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोज गुरुवारला आयोजित केली होती. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून गोंडवाना विद्यापीठ प्रकुलगुरू डॉ. श्रीराम कावळे हे उपस्थित होते. नविन शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीचे महत्व त्यांनी विषद केले. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री संदीपभाऊ गड्डमवार यांनी अशाप्रकारच्या कार्यशाळा या प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या ज्ञानात मौलिक भर घालतात. अशाप्रकारच्या कार्यशाळा महाविद्यालयानी आयोजित कराव्यात असे आपल्या अध्यक्षीय भाषणातून विषद केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आनंद निकेतन महाविद्यालय वरोरा चे प्राचार्य डॉ. मृणाल काळे उपस्थित होते. कार्यकमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली यांनी केले. कार्यशाळा आयोजित करण्यामागची भूमिका महत्व व बदलत्या काळात विषयाची उपयुक्तता विषद केली कार्यक्रमाचे संचालन डॉ. राजश्री मार्कंडेवार तर आभार डॉ. दिलीप कामडी आयोजन सचिव यांनी केले. या कार्यशाळेला तज्ञ मार्गदर्शक माणून गोडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे डॉ. विवेक जोशी (इग्रजी पदव्युत्तर विभाग) व डॉ. देवदत्त तारे (वाणिज्य पदव्युत्तर विभाग) यानी मार्गदर्शन केले. प्रा संदीप देशमुख व डॉ. रामचंद्र वासेकर यांनी तांत्रिक बाजू सांभाळली. समारोपीय कार्यक्रम भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलभाऊ स्वामी याच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्रमास शिवाजी महाविद्यालय राजुराचे प्राचार्य डॉ. संभाजी वरकड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समारोपीय कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. प्रफुल वैराळे यांनी केले, कार्यशाळेसाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्हातील विविध महाविद्यालयातून 100 प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य लाभले.