संशोधन हे समाज हिताचे असावे- डॉ. सिद्धनाथ भोसले
सावली: गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येते इनोव्हेटिव्ह ट्रेंड इन हायर एज्युकेशन अँड रिसर्च या विषयावरील आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेला बीजभाषक म्हणून उपस्थित असलेले डॉ. सिद्धनाथ भोसले यांनी संशोधन छोटे असावे परंतु ते समाज हिताचे असावे असे महत्त्वपूर्ण भाष्य केले. संशोधन क्षेत्रातील भारतीय जर्नल ला कमी न लेखता आपणच आपल्या संशोधनाच्या माध्यमातून त्यांना मोठं केलं पाहिजे.

भारतीय जर्नल सुद्धाआज संशोधन क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत असून लोकल ते ग्लोबल चा आजचा काळ आहे असं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन भोसले यांनी केलं या परिषदेच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीडवार ,उद्घाटनस्थानी गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ अनिल चिताळे हे होते. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ आशिष लिंगे प्रमुख उपस्थितामध्ये डॉ. ए. चंद्रमौली ,सौ. नंदाताई अल्लूरवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या राष्ट्रीय परिषदेचे प्रस्ताविक महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे यांनी केलं याप्रसंगी राष्ट्रीय परिषदेच्या सोविनियरचं प्रकाशनही करण्यात आलं या परिषदे करिता विविध महाविद्यालयातील सहाशे प्रतिनिधी उपस्थित होते. या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक डॉ. आशिष लिंगे यांनी संशोधन निरंतर चालणारी प्रक्रिया असून संशोधनाकडे गांभीर्याने बघून मूलभूत आणि ज्ञानात नवी भर घालणारे संशोधन करणे आजची काळाची गरज आहे असं महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं उद्घाटनिय मनोगत डॉ. अनिल चिताळे यांनी व्यक्त करताना नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 याची अंमलबजावणी करत असताना संशोधन आणि कौशल्य विकास अतिशय महत्त्वाचा असून नवी पिढी सक्षम बनवण्यासाठी कार्य करणे गरजेचे असून नवनवीन ज्ञानाच्या निर्मितीमध्ये संशोधकांनी आपली ऊर्जा खर्च करावी असे महत्त्वाचे विधान केले. उद्धघाटणीय सोहळ्याचे अध्यक्ष राजाबाळ पाटील संगीडवार यांनी राष्ट्रीय परिषद ही विद्यार्थी संशोधक, प्राध्यापक यांच्या ज्ञानात भर घालणारी असुन या परिषदेच्या माध्यमातून उच्च शिक्षण व संशोधनामधील नाविण्यपूर्ण कलावर विचारमंथन होईल.असे अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
उद्घघाटनीय सोहळ्याचं संचालन डॉ. राजश्री मार्कंडेवार यांनी केलं तर आभार राष्ट्रीय परिषदेचे समन्वयक डॉ. दिलीप कामडी यांनी मानले यानंतर कला , वाणिज्य आणि विज्ञान या तीनही शाखेंतर्गत टेक्निकल सेशन घेण्यात आलं या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. परमानंद बावनकुळे, डॉ. उत्तमचंद कांबळी, डॉ. जयदेव देशमुख, डॉ. प्रविन तेलखेडे, डाॅ.प्रशांत झाकी ,डाॅ.नंदाजी सातपुते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या टेक्निकल सेशनमध्येजवळपास 30 संशोधकांनी आपले पेपर सादर केले त्यानंतर पोस्टर कॉम्पिटिशन सुद्धा यावेळी घेण्यात आली. या सत्राचे संचालन डॉ रामचंद्र वासेकर डॉ. विजयसिंह पवार , डॉ. प्रकाश घागरगुंडे, डॉ सचिन चौधरी यांनी केलं. समारोपीय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे तर प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठ मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. ए. चंद्रमौली, डॉ. संजय बेले, डॉ. नंदाजी सातपुते, डॉ. विवेक गोरलावार, डॉ. राजेंद्र झाडे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते समारोपीय सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र वासेकर यांनी केले तर आभार परिषदेचे समन्वयक प्रा. प्रशांत वासाडे यांनी मानले. या परिषदेच्या यशस्वीकरिता महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .



