Vidarbh24News

Latest Online Breaking News

*रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी*

कवठी प्रतिनिधी ( राकेश घोटेकार)

सावली लगतच असलेल्या मौजा रुद्रापूर येथील शेतकरी श्री ढेकलू मारोती झरकर वय 60 वर्ष हे सकाळी नेहमी प्रमाणे शेतकामाकरिता गेले असता सकाळी 9 च्या सुमारास त्यांच्यावर अचानक रानडुकराने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले असून त्यांच्या हाताला व पोटाला मार लागले आहे. त्यानंतर त्यांनी आरडाओरड केले असता आजूबाजूचे शेतकरी धाव घेत सदर घटनेची माहिती वनविभाग ला देण्यात आली. वनरक्षक चौधरी, राजूरकर यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केले व जखमी शेतकऱ्याला उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय सावली येथे दाखल करण्यात आले असून पुढील उपचार सुरु आहे. तर त्याच परिसरात मेंढपाळ आपल्या मेंढया चारत असताना वाघाने हल्ला करून दोन मेंढया लंपास तर एक मेंढी जखमी केले असल्याचे नागरिकाकडून बोलले जात आहे.

वन्यप्राण्याचे धुमाकूळ व शेतकऱ्यावर वन्यप्राण्यांपासून हल्ले होत असल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे त्यामुळे वन्यप्राण्यांचे बंदोबस्त करावे अशी मागणी परिसरातील शेतकऱ्याकडून केली जात आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!