Vidarbh24News

Latest Online Breaking News

प्रभारी गट शिक्षणाधिकाऱ्यांना हटवा

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक ची मागणी*
शिक्षकांना प्रलंबित समस्यांसाठी कार्यालयात बोलवत पैशाची मागणी करून नाहक त्रास देणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्यांचा प्रभार तात्काळ काढण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक च्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी सिंदेवाही यांचेकडे निवेदनातून केली आहे.
पंचायत समिती सिंदेवाही येथे किशोर पिसे हे विस्तार अधिकारी (शिक्षण) म्हणून कार्यरत आहेत. मागील वर्षी कार्यरत गटशिक्षणाधिकारी यांची बदली झाल्याने यांचेकडे गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. त्यांनी शिक्षकांच्या अनेक समस्या प्रलंबित ठेवल्या. ते आता प्रलंबित समस्या व अनेक कार्यालयीन कारणांसाठी शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यालयात उपस्थित राहण्यास बाध्य करून पैशाची मागणी करीत आहेत. मागणी पूर्ण न केलेल्या शिक्षकांना कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत. आधीच शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे, त्यात शाळा वाऱ्यावर सोडून शिक्षकांना कार्यालयात बोलविण्यात येत असल्याने शिक्षकांत कमालीचा असंतोष पसरला आहे.
यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक च्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष मोरेश्वर गौरकार यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन समस्या मांडली व तातडीने प्रभार काढण्याची मागणी निवेदनातुन केली आहे. शिष्टमंडळात तालुका अध्यक्ष नामदेव सुरपाम, सल्लागार दिनेश टिपले, प्रकाश कोयताडे, कार्यवाह प्रशांत गोरलावार, महिला आघाडी प्रमुख अनिता मसराम यांचा समावेश होता.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!