*मौजा जांब रैयतवारी येथे शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात संपन्न*
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूल कार्यक्रम व संस्कृतीक कार्यक्रम संपन्न
सावली:- तालुक्यातील मौजा जांब रैयतवारी येथील स्वराज्य रक्षक मंडळ यांच्या आयोजनातून महाराष्ट्राचे आराध्य दैवत,कुळवाडी भूषण,,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन जि. प. प्राथमिक शाळा जांब रयतवारी येथे करण्यात आले होते. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घघाटक म्हणून श्री. निखिलभाऊ सुरमवार काँग्रेसचे युवा नेते तथा कृषिउत्पन बाजार समिती सावलीचे संचालक व या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. किशोरभाऊ घोटेकार सामाजीक कार्यकर्ते सिंदोळा व प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सदस्य श्री श्रीकृष्ण बोदलकर सौ प्रियांका हुलके तसेच रणजित सोनटक्के यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरीक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शिवजन्मोत्सव सोहळा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन श्री नवनाथ वासेकर प्रास्ताविक कांबळे सर मुख्याध्यापक जांब रयतवारी तर आभार भागवत भुरसे यांनी मानले….कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी स्वराज्य रक्षक मंडळाच्या सर्व सदस्यांनी व गावकरी मंडळी मेहनत घेतली



