सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, १० हजार रुपयाची स्वीकारली लाच.
सहाय्यक पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात, १० हजार रुपयाची स्वीकारली लाच.
वरोरा:– तक्रारदाराला चन्द्रपुर ते नागपुर या मार्गावर तूझ्या वाहनाने अपघात झाला असुन त्यात एक इसम मृत्यू झाल्याचे सांगुन या अपघाताच्या गुन्ह्यात आरोपी न करण्याच्या कामासाठी चंद्रपूर येथील रहीवासी असलेले तक्रारदार यांना वरोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश खाडे यांनी तक्रारदाराला १० हजाराची मागणी केली. याबाबत त्यांनी एसीबी चंद्रपूर येथे तक्रार दिली त्याच्या आधारावर एसीबीने सापळा कारवाईचे नियोजन करून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री रमेश संपतराव खाडे (३ ०)यांना लाचेची रक्कम रु. १० हजार तक्रारदाराकडून घेताना जाळ्यात अडकले. त्यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुधलवार यांच्या नेतृत्वात उपअधीक्षक अविनाश भामरे ला.प्रा.वि. चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक वैशाली ढाले, कर्मचारी नापोशी.अजय बागेसर, पोकाँ रवीकुमार ढेंगळे, रोशन चांदेकर, वैभव गाडगे, चालक दाभाडे यांनी केली आहे.



