आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित,
आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित,
विदर्भ 24 न्यूज
जिल्हाप्रतिनिधी / गडचिरोली : आज १६ जून पासून पुढील आदेशापर्यंत मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपूर येथील आदिवासी मुलांच्या वसतीगृहाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यात बाहेरून आलेल्या ५१ जणांना कोरोना व्हायरस म्हणजेच कोविड – १९ ची लागण झाली आहे. यामुळे रूग्ण आढळलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे. आज रोजी दोन महिला दिल्लीवरून तर एक महिला चंद्रपूर येथून प्रवास करून मुलचेरा तालुक्यात आल्या होत्या. त्यांचे अहवाल पॉझीटिव्ह आले होते. विवेकानंदपूर येथील आदिवासी मुलांचे वस्तीगृह , पश्चिमेस प्रदिप फौजदार व शिशीर बाला यांच्या घरापर्यंतचा परिसर, उत्तरेस नारायणदास जयदेव बाला यांचे किराणा दुकान व राजु बाला यांच्या घरापर्यंत आणि दक्षिणेस आदिवासी मुलांचे वस्तीगृह व आश्रमशाळा संरक्षणभिंती पर्यंत व शिवेंद्र मंडल यांच्या घरापर्यंतचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या परिसरात शासनाने लागू केलेल्या सर्व अटी व शर्ती लागू करण्यात आल्या आहेत. यामुळे परवानगीशिवाय कोणतीही कृती करू नये, कोणत्याही व्यक्तीला वा साधनाला सदर क्षेत्रात ये – जा करण्यास मनाई राहील, असे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष दिपक सिंगला यांनी कळविले आहे.



