बाबासाहेबांच्या सन्मानासाठी बौद्ध बांधवांनी सोडले गाव
चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथील धक्कादायक घटना
• गडचिरोली: गावाच्या मुख्य चौकात ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन लावलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नामफलक काढल्याने दुखावलेल्या बौद्ध बांधवानी गुरूवार, 21 डिसेंबर रोजी कुटुंबासह गाव सोडल्याची धक्कादायक घटना चामोर्शी तालुक्यातील नवरगाव येथे घडली. या घटनेचा निषेध म्हणून गडचिरोली चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
या घटनेने संताप व्यक्त होत असून दोषीवर कारवाईची मागणी होत आहे. नवरगाव येथे दीड वर्षापासून येथे डॉ. आंबेडकर यांच्या नावाच्या फलकावरुन वाद सुरु आहे. प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना 20 डिसेंबरला 200 पोलिसांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतीने नामफलक काढले. यावरुन प्रशासनाप्रती नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायतीच्या सहमतीनेच फलक लावले मग ते का काढले, असा
प्रश्न उपस्थित केला. ज्या गावात घटनेच्या शिल्पकाराचे नामफलक लावण्याचा अधिकार नाही, त्या गावात राहायचे कशाला, असे म्हणत 40 कुटुंबातील 200 लोकांनी आपल्या गरजेच्या वस्तू सोबत घेऊन गुरुवारी सकाळी गाव सोडले. सायंकाळच्या सुमारास सर्वजण बैलबंडीवरुन गोविंदपूर नाल्याजवळ पोहचले, तेथे त्यांनी ठिय्या ठोकला असून उद्या जिल्हा मुख्यालयाकडे निघणार असल्याची माहिती, नवरगावच्या उपसरपंच करिश्मा कनिकर यांनी दिली.
*यापूर्वी सुध्दा गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता*
नवरगाव येथील बौद्ध बांधवांनी या पूर्वीसुद्धा गाव सोडण्याचा निर्णय घेतला होता, मात्र प्रशासनाने तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने गाव सोडण्याचा निर्णय रद्द केला. मात्र गेल्या महिन्याभरापासून गावात ताण- तणावाचे वातावराण निर्माण झाले. अप्रत्यक्ष सुरु झालेला त्रास आणि डॉ. बाबासाहेबांचे नामफलक हटविल्याने



